Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : दारूसाठी पैसे न दिल्याने मद्यपीचा धिंगाणा; कारच्या फोडल्या काचा

Nashik News : नाशिकच्या ठेंगोडा येथे हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका दुकानदाराची दगडाने गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिकच्या सटाणा तालूक्यातील ठेंगोडा येथे एका मद्यपीने धिंगाणा घातल्याचा प्रकार घडला. यात दुकानदाराने दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने या मद्यपीने कारच्या काचा फोडल्या. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

नाशिकच्या (Nashik News) ठेंगोडा येथे हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी एका दुकानदाराची दगडाने गाडीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास मद्यपी कैलास पगारे हा गावातील हर्षल कोठवदे यांच्या दुकानात गेला. येथे जाऊन त्याने दारु पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र दुकानदाराने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्या दुकानासमोर लावलेली त्यांच्या कारला दगडाने मारत करच्या काचा फोडल्या. 

पोलिसात तक्रार दाखल 

इतकेच नाही तर गाडीच्या काचा फोडणारा सदरचा मद्यपी गावातील अन्य लोकांना अडवून त्यांना दमदाटी करत त्यांच्या कडून पैशांची मागणी करीत असल्याच गावकरी सांगतात. दरम्यान या घटनेनंतर सटाणा पोलिसात कैलास पगारे याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Black Coffee For Weight Loss: 30 दिवस ब्लॅक कॉफी प्यायल्याने वजन कमी होते का? जाणून घ्या

Weight Loss : वाढतं वजन अन् चरबीची चिंता सोडा! आजपासूनच डाएटमध्ये खा 'या' पिठाची भाकरी

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

SCROLL FOR NEXT