अजय सोनवणे
मनमाड (नाशिक) : हिट अँड रनच्या अनेक केसेस सध्या राज्यात समोर येत आहेत. अशात नाशिकच्या मनमाडमध्ये ड्रंक अँड ड्राइव्हचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत वाहन चालवत रस्त्यावर एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली असून या प्रकरणी रेल्वेच्या सुरक्षा बल निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात मागील काही दिवसात हिट अँड रन झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकामागून एक अशा घटना घडत असताना कडक कारवाई अद्याप झाल्याचे पाहण्यास मिळत नाही. दरम्यान मनमाडमध्ये (Manmad) दारूच्या नशेत गाडी चालविण्याचा प्रकार समोर आला आहे. मुळात दारू पिऊन गाडी चालविणे गुन्हा असताना अनेकजण मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असतात. त्यानुसार मनमाडमध्ये घडला आहे. (Drunk And Drive) रेल्वे सुरक्षा बलाचा अधिकारी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दुचाकीला उडविले
मद्यधुंद अवस्थेत सरकारी वाहन चालवत रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीपकुमार सुदेशसिंग देसवाल यांनी आययुडीपी भागात रस्त्यावर असलेल्या दुचाकीला मागून धडक देत दुचाकीस्वार व सात वर्षीय मुलगी खाली पाडले. दरम्यान धडक दिल्यानंतर अधिकाऱ्याने दमदाटी करीत शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर अधिकाऱ्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राईव्हसह विविध कलमान्वये मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.