Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : तीन महिन्यांपासून फरार ड्रग्ज माफिया ताब्यात; गुंडा विरोधी पथकाने भोपाळमधून घेतले ताब्यात

Nashik News : नाशिक शहराला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढणं हे नाशिकच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त समोरील आव्हान होते

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नाशिक शहरातील ड्रग्ज माफिया मोक्का गुन्हातील मुख्य आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. मात्र (Nashik) नाशिकरोड पोलीस ठाणेमध्ये एनडीपीएस ऍक्टप्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या या आरोपीला भोपाळमधून अटक करण्यात आली (Police) आहे. गुंडा विरोधी पथकाने हे कामगिरी केली आहे. (Latest Marathi News)

नाशिक शहरातील ड्रग्ज माफिया मोक्का गुन्हातील मुख्य आरोपी अक्षय गणेश नाईकवाडे हा सराईत गुन्हेगार गुन्हा घडल्यापासून सुमारे ३ महिन्यापासून गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड अशा राज्यामध्ये आपले अस्तित्व लपवून फिरत होता. ड्रग्ज माफियाला अटक करणं व नाशिक शहराला ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर काढणं हे (Nashik Police) नाशिकच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त समोरील आव्हान होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोक्का अन्वये गुन्हेगारावर कडक कारवाई करून नाशिक शहरातून एमडी /ड्रग्ज सारखा घातक पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपिंवर कारवाईचे निर्देश दिले. नाशिक शहरामध्ये नवीन तयार झालेले गुन्हे शाखेअंतर्गत पथकाची कामगिरी पाहून यापूर्वी गुंडा विरोधी पथकाने अशा गंभीर व क्लिष्ट स्वरूपाच्या गुन्हातील आरोपींना शिताफिने परराज्यातून अटक केल्याची माहिती घेतली. पोलीस आयुक्तानी मोक्का गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार अक्षय गणेश नाईकवाडे यास पकडून अटक करण्याबाबत गुंडा विरोधी पथकास आदेशीत केले. त्याप्रमाणे गुंडा विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या पथकाने भोपाळमध्ये जाऊन ही कारवाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

SCROLL FOR NEXT