Dengue Viral Saam tv
महाराष्ट्र

Nashik Dengue Viral : नाशिक शहराला डेंग्यूचा डंख; २७ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह

Nashik News नाशिक शहराला डेंग्यूचा डंख; २७ रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिक शहराला डेंग्यूच्या आजारानं विळखा घातला आहे. महिनाभरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून पालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज ३० हून अधिक डेंग्यू सदृश्य रुग्ण (Nashik) तपासणीसाठी येत आहेत. यात २१६ पैकी २७ रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढलीय. (Maharashtra News)

पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचत असल्यानं डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यूच्या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होतेय. खाजगी रुग्णालयात डेंग्यूसाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात असली तरी ही साईड टेस्ट असल्याने रुग्णाला डेंग्यूसदृश आजाराची लागण असल्याच समजल जात. यातील एलायाझा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास डेंग्यूची लागण झाल्याची नोंद होते; अशी माहिती नाशिक पालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितिन रावते यांनी दिली. 

आकडा अधिक असण्याची शक्यता 

शासकीय रुग्णालयांपेक्षा खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने रुग्णांचा आकडा मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ड्राय डे पाळून घरातील भांडी रिकामी करून ठेवावी आणि पाण्याचे भांडे स्वच्छ झाकून ठेवावे, संशयित रुग्णांनी घाबरून न जाता तत्काळ उपचार घेण्याच आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

Fact Check: काळ्या बुरशीचा कांदा खाल, जीवानं जाल? बुरशीयुक्त कांद्यामुळे किडनी, लिव्हरला धोका?

देवेंद्र फडणवीसांना केंद्रात नवी जबाबदारी? दिल्लीत भाजपच्या गोटात हालचाली

क्रिती सेनन कपड्यांवरून ट्रोल; राहुल गांधींची सडेतोड प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT