Municipal Commissioner Residence Saam tv
महाराष्ट्र

Municipal Commissioner Residence : महापालिका आयुक्त निवासस्थानाची शहरभर चर्चा; वास्तूदोषाचा विषय येतोय समोर, आयुक्त कार्यालयाकडून मात्र इंकार

Nashik News : महापालिका आयुक्त निवासस्थानाची शहरभर चर्चा; वास्तूदोषाचा विषय येतोय समोर, आयुक्त कार्यालयाकडून मात्र इंकार

Rajesh Sonwane

तबरेज शेख 

नाशिक : शासकीय निवासस्थानी अधिकारी, कर्मचारीला राहण्याचे बंधनकारक आहे. परंतु नाशिक (Nashik) महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांचे शासकीय निवासस्थान सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहे. निवासस्थानी वास्तुदोष असल्याने बांगला खाली केल्याची चर्चा संध्या आहे. (Live Marathi News)

नाशिक शहरातील गडकरी चौक या परिसरात महापालिका आयुक्तांचे शासकीय निवासस्थान आहे. मात्र ऐन सणासुदीच्या दिवशी नाशिक शहरात एक वेगळी चर्चा सुरू झालीय. आयुक्त निवासस्थानी वास्तुदोष (ANIS) असल्याने महापालिका आयुक्त खाजगी घरात राहण्यासाठी गेल्याची चर्चा नाशिक शहरात आहे. 

अंनिसकडून या प्रकारचा निषेध 

अशाप्रकारे जर उच्चपदस्थ अधिकारी वास्तुदोषाच्या समजातून खाजगी ठिकाणी राहण्यासाठी जात असेल, तर हे चुकीचं असल्याची टीका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून अशा रीतीने अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असेल, तर याचा निषेध देखील करण्यात आलाय.

आयुक्त कार्यालयाकडून खरे कारण आले समोर 
मात्र असा वास्तुदोष वगैरे काही नाही. शासकीय निवासस्थानी बंगल्याची दुरुस्ती सुरू असल्याने आयुक्त काही कालावधीसाठी खाजगी फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेले असल्याचे स्पष्टीकरण आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलंय. मात्र या तर्कवितर्काने नाशिक शहरात वेगळीच चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT