CBI Action In Nashik Saam tv
महाराष्ट्र

CBI Action In Nashik : नाशिकमध्ये सीबीआयची कारवाई; दोन लाखाची लाच घेतांना पीएफ आयुक्तांसह दोन जण ताब्यात

Nashik News :नाशिक येथील रहिवासी असलेल्या ईपीएफओ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना दोन (Nashik) लाखाच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला दोन लाखाची लाच (Bribe) घेताना कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

नाशिक येथील रहिवासी असलेल्या ईपीएफओ अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. ईपीएफओ अधिकार्‍याने खाजगी पीएफ सल्लागारासोबत (CBI) अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराला खाजगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही करण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी 

या प्रकरणी सीबीआयने सापळा रचून एक व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आली. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fort In Mumbai : मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार, वांद्रेपासून हाकेच्या अंतरावर वसलाय 'हा' किल्ला

Petrol- Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका, ७ दिवसात काय काय महागले?

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

SCROLL FOR NEXT