Malegaon Corporation Saam tv
महाराष्ट्र

Malegaon Corporation : मालेगाव महापालिकेच्या १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल; २० लाखाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका

Malegaon News : नाशिकच्या मालेगाव महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासून पहाणे; ही प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपूर्वक टाळली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : महापालिकेने दिलेले कामे तपासण्याची जबाबदारी टाळून ठेकेदाराला रक्कम अदा करण्यात आली होती. यात महापालिकेचे आर्थिक केल्याचा ठपका ठेवत मालेगाव महापालिकेच्या १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नाशिकच्या (Nashik) मालेगाव महानगरपालिकेच्या प्रत्यक्ष कामावर झालेला खर्च आणि कामे तपासून पहाणे; ही प्रशासकीय जबाबदारी असतांना ती जाणीवपूर्वक टाळली. इतकेच नाही तर काम घेणाऱ्या संबंधित ठेकेदाराला २० लाख ६८ हजार रुपये अदा करण्यात आले. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याचे निष्पन्न झाले आहे. यावरून (Malegaon) महापालिकेच्या सध्या कार्यरत असणारे व काही सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी अशा १५ जणां विरोधात नाशिकच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने किल्ला पोलिसात तक्रार दाखल करत गुन्हा नोंदविला आहे. 

महापालिकेत खळबळ 

अपहार केल्याप्रकरणी कर्मचारी व अधिकारीवर गुन्हा दाखल झाल्याचे ऐकले आहे. परंतु महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणीतब्बल १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच वेळी एवढ्या अधिकाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल झाल्याने महापालिका क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT