Gangapur Dam Saam tv
महाराष्ट्र

Gangapur Dam : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी; गंगापूर धरणाची क्षमता २ कोटी १५ लाख लिटरने वाढली

Nashik News : ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे ५.५ टीएमसीपर्यंत कमी झाल्यानं गाळ काढला जात आहे.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : धरणात गाळ अधिक प्रमाणात झाल्याने धरणात साठणाऱ्या पाण्याची क्षमता कमी होत असते. यामुळे धरणातील गाळ काढला जात असतो. त्यानुसार (Nashik) नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील गाळ काढण्यात आळ्यात धरणातील पाणी क्षमता २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने वाढली आहे.

यंदा पाऊस (Rain) कमी झाल्याने पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. मुळात धरणात गाळ असल्याने पाणी साठा कमी झाला आहे. शिवाय धरणात असलेला पाणी साठा देखील कमी होऊ लागला आहे. हीच परिस्थिती (Gangapur Dam) गंगापूर धरणाची असून ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे ५.५ टीएमसीपर्यंत कमी झाल्यानं गाळ काढला जात आहे. मागील १४ दिवसांपासून धरणातून गाळ काढण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. गंगापूर धरणातून मागील १४ दिवसांत २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढली आहे. 

१५ जूनपर्यंत चालणार काम 

दररोज १० तास जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जात असून २१ हजार ६२३ क्युबिक मीटर इतका गाळ काढण्यात आला. धरणातून काढलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवला जात आहे. १५ जूनपर्यंत गाळ काढण्याचं काम सुरू राहणार असल्यानं धरणाच्या क्षमतेत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT