Nashik- Mumbai Highway Saamtv
महाराष्ट्र

Nashik- Mumbai Highway Accident: कसारा घाटात ब्रेक फेल होऊन ट्रक- बसचा भीषण अपघात; ३ जखमी; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला!

Nashik- Mumbai Highway: नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात बसमधील ड्रायव्हरसहित २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Gangappa Pujari

फयाज शेख, नाशिक|ता. २६ जानेवारी २०२६

Nashik Kasara Ghat Accident:

नाशिकमधून एक मोठी अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक- मुंबई महामार्गावरील कसारा घटात बस आणि दोन ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील ड्रायव्हरसहित २ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक मुंबई महामार्गावर (Nashik- Mumbai Highway) नवीन कसारा घाटात ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात झाल्याचे समोर आले आहे. घाटामध्ये अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ओव्हरटेक करून जात असताना पुढे जाणाऱ्या बस व भंगार वाहतूक करणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली.

सुदैवाना या धडकेनंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत बस महामार्गालगत असलेल्या नाल्यात वळवली. ज्यामुळे मोठी जिवितहानी टळली. या अपघातात बसमधील ड्रायवरसह दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहेत. या बसमधून एकूण ४० ते ५० प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व प्रवाश्यांना दुसऱ्या बसने इच्छित स्थळी केले रवाना करण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, या अपघातात भंगार घेऊन जाणारा ट्रक रस्त्यात पलटी झाल्याने पूर्ण रस्त्यावर भंगार पसरुन येणा- जाणाऱ्या वाहनांना मोठा अडथळा निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस केंद्र घोटी च्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच रस्त्यावरील ट्रक व पसरलेले भंगार बाजूला करून वाहतूक केली सुरळीत करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT