Nashik- Chhatrapati Sambhajinagar Road Accident: Saamtv
महाराष्ट्र

Nashik Accident: नाशिकमध्ये भीषण अपघात! ट्रॅव्हल्स- ट्रकची समोरासमोर धडक, १ जागीच ठार; ७ जखमी

Nashik- Chhatrapati Sambhajinagar Road Accident: नाशिक- छत्रपती संभाजीनगर रोडवर ट्रॅव्हल्स बस व ट्रकचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून ७ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

अजय सोनवणे, नाशिक|ता. ८ जून २०२४

नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात १ जणाचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झालेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 1 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते. दर्शनावरुन परत येताना देशमाने गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल बस रस्त्याच्या कडेला शेतात घुसली.

याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात ट्रॅव्हल्य चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी झालेत. जखमी झालेल्या रुग्णांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT