Nashik Dindori Shivsena News Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! शेकडो शिवसैनिकांनी सोडली साथ

दिंडोरी तालुक्यातील काही आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uddhav Thackeray vs Eknath Shinde : नाशिक जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला  (Uddhav Thackeray) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दिंडोरी तालुक्यातील काही आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला आहे.  (Maharashtra Political News)

सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, राजू आणा लवटे, ग्रामीण जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के देत आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील ११ माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडली होती. आता पुन्हा एकदा शेकडो शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांची ढालतलवार हाती घेतली आहे. (Latest Marathi News)

यामध्ये दिंडोरीचे माजी आमदार धनराज हरिभाऊ महाले, सहकार नेते, मा. जिल्हा परिषद सदस्य सुरेश डोखळे, शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हा प्रमुख सुनील पाटील, मा. संचालक कादवा, एम. व्ही. पी. संचालक नाशिक संपतकाका घडवजे, जेष्ठ नेते बाळासाहेब मेधने, मा. सभापती पंचायत समिती दिंडोरी भगवान ढगे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष दिंडोरी बाळासाहेब दिवटे, सोसायटी चेअरमन सचिन बर्डे, शिवसेना उप तालुका प्रमुख यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दुसरीकडे नाशिक शहरातील माजी नगरसेवक हरीश भडांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी जाधव, शिवसेना शिक्षण मंडळ सदस्य व शिवसेना महानगर संघटक बाबुराव आढाव यांनी देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रसंगी नगरसेवक सूर्यकांत लवटे, सुदाम डेमसे, आर डी धोंगडे, नितीन खर्जुल, प्रताप मेहरोलीया, अँड. अभय महादास, लकी ढोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT