Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : सरकार स्थापनेबाबत तेव्हाच आमचेही ठरले होते, पण जमलं नाही; अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Nashik News : राज्य, महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार हा जाहिरनामा देत असून केद्र सरकार पाठिशी आहे

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

पिंपळगाव (नाशिक) : महायुतीच्या सरकारने चांगलं काम केलं. काही राजकीय स्थित्यंतर घडली. यात एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली. त्यानंतर ते सरकारमध्ये गेले. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये गेले. आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील ठरविले होते. पण त्यावेळी अशा काही घटना घडल्या त्यामुळे जमलं नाही; असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.  

नाशिकच्या (Nashik) पिपळगाव येथे आयोजित सभेदरम्यान अजित पवार बोलत होते. दिलीप बनकर यांना निवडुन आणा सर्व ताकदवान आपल्यासोबत आहे. राज्य, महायुती आणि आमचा उमेदवार काय करणार हा जाहिरनामा देत असून केद्र सरकार पाठिशी आहे. त्यामुळे तुमच्या सर्व योजना पूर्ण करू; असे आश्वासन देखील पवार (Ajit Pawar) यांनी दिले. राष्ट्रवादीच्या आमदारांचे देखील ठरले होते. माझ्यासह दिलीप बनकर, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, सरोज अहिरे आणि छगन भुजबळ आणि नितीन पवारांसह अनेकांच्या सह्या होत्या. पण त्यावेळी अशा काही घटना घडल्या, त्यामुळे जमलं नाही. पण कोरोनात वेळ गेला असे कार्यकर्ते आणि सहकारी सतत म्हणायचे.  

तुम्हीतर सव्वा रुपयाची दक्षिणाही दिली नाही 

लाडकी बहीण योजनेवर अनेकांनी टीका, आरोप केले. महाराष्ट्र बिघडवीत आहेत, दिवाळखोरीत काढतो; असे आरोप केले. पण मी आर्थिक शिस्तीचा माणूस आहे. यामुळे नियमात असेल तरच एकतो. यामुळे गरिबाला दिले. जातपात बघत नाही. जी गरीब बहीण आहे, तिला लाडकी बहिण योजनेचा लाभ दिला. आम्ही इतके दिवस सत्तेत होते. आमच्याही लक्षात आले नाही हे दुर्दैव आहे. तुम्ही सत्तेत असताना सव्वा रुपया दक्षिणाही दिली नाही. पण आता आमच्या सरकारने थेट खात्यावर पैसे दिले. यात मध्यस्थी कोणीच ठेवला नाही. आचारसंहिता येणार म्हणून ऑक्टोबरमध्येच पैसे दिले. काळजी करू नका पाच वर्षे योजना राबवायची असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार 
लाईट बिल माफ केले. साडेनऊ हजारात सोलर दिले. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. यामुळे त्यांना रात्री शेतात जाण्याची गरज नाही. शेत शिवारात बिबट, रानडुक्कर, गवे येतात. यामुळे घरचेही काळजित असतात. अजितदादाचा वादा आहे, पुढील ५ वर्ष विजबिल माफ करणार. तसेच १ ऑक्टोबरपासून गायीच्या दुधाला ७ रुपये अनुदान दिले. शेतकऱ्याच्या खात्यावर थेट पैसे देतोय. यात पारदर्शकता आहे मध्ये गळती नाही. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT