Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : घरात आढळली कोब्रा जातीची ५ विषारी पिल्ले; सुदैवाने परिवार बचावला

Nashik News घरात आढळली कोब्रा जातीची ५ विषारी पिल्ले; सुदैवाने परिवार बचावला

अभिजीत सोनावणे

नाशिक : साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. आणि तेच साप जर घरात सापडले तर त्याहून भीती असते. (Nashik) डिजीपी नगर २ येथील केवल पार्क भागात एका घरात नागाच्या कोब्रा जातीची (Snake) विषारी ५ पिल्ले आढळली. सर्पमित्राने ते शिताफीने पकडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. (Breaking Marathi News)

नाशिक शहरातील डीजीपीनगर २ मधील अष्टविनायक नगर, केवल पार्क येथे गजानन ताथे यांच्या रो हाऊसमध्ये सापाची पिल्ले असल्याचे सर्पमित्र तुषार गोसावी यांना नागरिकांनी कळविले होते. ते तत्काळ त्या घरी पोहचले. त्यांनी मोठ्या शिताफिने ही पिल्ले पकडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. सर्पमित्र गोसावी यांनी घराची पाहणी केली असता चेंबरजवळ डगमध्ये नागीण दिसली. मात्र तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी घुसीने केलेल्या बिळाच्या मार्गाने ती गायब झाली. 

शोधत असताना टॉयलेटच्या जाळीच्या मार्गाने किचनमध्येही शिरलेली काही पिल्ले आढळली. नंतर दुसऱ्या दिवशीं बेडरूममध्ये मिळालेली काही असे मिळून एकूण पाच पिल्ले शिताफीने पकडण्यात आले. कोब्रा जातीच्या विषारी नागाची ही पिल्ले आहेत. नागीण एकावेळी दहा ते बारा पिल्ले देते. त्यामुळे आणखी काही पिल्ले आहेत का याचा शोध घ्यावा लागेल असेही स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

Maharashtra News Live Update: बोरिवलीच्या अॅनेक्स मॉलमध्ये लागली आग

SCROLL FOR NEXT