Nashik Muncipal Corporation Saam TV
महाराष्ट्र

नाशिक महापालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; प्रभाग रचना जाहीर

नव्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अनेक वार्ड आणि प्रभागांची मोडतोड झालेली असली तरी विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक: नाशिक महापालिकेच्या (Nashik Muncipal Corporation) निवडणुकीचं बिगुल वाजलं असून महापालिकेची बहुचर्चित नवी प्रभाग रचना अखेर आज जाहीर झाली आहे. नाशिक महापालिकेत विद्यमान 122 नगरसेवक असून राज्यसरकारच्या (State Government) नव्या निर्णयानुसार आता नगरसेवकांची संख्या 133 होणार आहे. नव्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेमध्ये साधारणपणे 33 हजार लोकसंख्येचा एक वॉर्ड अशी रचना करण्यात आली असून एकूण 44 प्रभाग करण्यात आलेत. (Nashik Municipal Corporation Election)

त्यापैकी 43 प्रभाग हे 3 नगरसेवकांचे तर 1 प्रभाग हा 4 नगरसेवकांचा करण्यात आला आहे. या सर्व प्रभागांचे प्रभागनिहाय नकाशे, त्यात समाविष्ट असणारा परिसर हे सर्व आज जाहीर झालेल्या आराखड्यात नमूद करण्यात आलं असून महापालिकेच्या अधिकृत वेबसाईट आणि विभागीय कार्यालयांमध्येही हा आराखडा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नव्या त्रिसदस्यीय प्रभाग रचनेत अनेक वार्ड आणि प्रभागांची मोडतोड झालेली असली तरी विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. दरम्यान आज प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी तसंच नागरिकांनी प्रारूप आराखडा आणि नकाशे पाहण्यासाठी गर्दी केली होती. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 14 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची मुदत असून नागरिकांनी लेखी स्वरूपात हरकती आणि सूचना सादर करण्याचं आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

Edited By- Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT