Railway  Saam tv
महाराष्ट्र

Railway : आता रेल्वेतही काढता येणार एटीएममधून रक्कम; रेल्वे प्रवासादरम्यान सुविधा

Manmad News : कधी कधी प्रवासाला निघताना घाईगडबडीत एटीएम मधून रक्कम काढणे शक्य होत नाही. तर वेळे अभावी एटीएममध्ये असलेल्या गर्दीमुळे रांगेत थांबता येत नसल्याने पैसे काढणे शक्य होत नाही

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : रेल्वे प्रवासाला जाताना अनेकदा पैसे घेण्याचा विसर पडत असतो. तर कधी घाईगडबडीत एटीएममधून पैसे काढायला जमत नाही. यामुळे प्रवासादरम्यान पैशांची अडचण निर्माण होत असते. मात्र प्रवाशांची हि अडचण आता दूर होणार आहे. कारण रेल्वेतच एटीएम मशीनची सुविधा करण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना आता रेल्वेतून प्रवास करताना देखील एटीएम मधून पैसे काढणे शक्य होणार आहे.

रेल्वेचा प्रवास म्हटला म्हणजे दोन दोन दिवसांचा देखील होत असतो. प्रवासाला निघताना बर्याचदा पैसे घेण्याचा विसर पडत असतो. तर कधी कधी प्रवासाला निघताना घाईगडबडीत एटीएम मधून रक्कम काढणे शक्य होत नाही. तर वेळे अभावी एटीएममध्ये असलेल्या गर्दीमुळे रांगेत थांबता येत नसल्याने पैसे काढणे शक्य होत नाही. परिणामी प्रवासादरम्यान पैशांची अडचण जाणवत असते. परंतु आता रेल्वेने प्रवाशांची हि अडचण दूर होणार आहे. 

एक्सप्रेसमध्ये एटीएम सुविधा 
प्रवाशांना रेल्वेत एटीएम सुविधा मिळणार आहे. याचा व्हिडियो देखील व्हायरल होत आहे. मनमाड- मुंबई सीएसटी धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस मध्ये ही सुविधा महाराष्ट्र बँकतर्फे उपलब्ध करण्यात आली आहे. अनेक वेळेस प्रवाशांना पैशाची निकड भासत असते. अशा परिस्थितीत रेल्वेतच प्रवाशांना एटीएम मधून पैसे काढण्याची सुविधा बँकेने उपलब्ध केली आहे. यामुळे प्रवाशांसाठी हि सुविधा सोयीची ठरणार आहे. 

एका बोगीत असणार सुविधा 

दरम्यान एक्सप्रेसमध्ये एटीएमची हि सुविधा सुरु करण्यात येत आहे. एका बोगीच्या रिकाम्या जागेमध्ये हे एटीएम उभारण्यात आले आहे. हे मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला शटर देखील लावण्यात आले आहे. यामुळे रेल्वे प्रवासात ज्याला पैशांची गरज आहे, तो रक्कम काढू शकले. असे असले तरी एटीएम सुरक्षेचा प्रश्न मात्र येथे राहणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: दरोड्यासाठी घुसलेल्या चोरट्यांकडून वृद्धाची निर्घृण हत्या

पठ्याने चक्क पेट्रोलसाठी आणली 500 लिटरची टाकी, पाहा VIDEO

Sunil Pal: मुंबईत प्रसिद्ध कॉमेडियनचा अपमान; मंचावर बोलावून सत्कार केला, नंतर माईक हिसकावून खाली पाठवलं, VIDEO व्हायरल

Morning Diet Mistakes: सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ खाणं टाळा

SCROLL FOR NEXT