Lasun Saam tv
महाराष्ट्र

Garlic Rate News: आवक वाढल्याने लसणाच्या दरात घसरण; दर निम्म्याने आले खाली

Lasun Price News : मागील महिनाभरापूर्वी तीनशे ते चारशे रुपये किलो दराने मिळणारा लसूण सामान्य कुटूंबाच्या घरात दुर्मिळ झाला होता. सध्या लसूण काढणीला सुरवात झाली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) :

Update on Garlic Rate

मार्केटमध्ये मागील महिनाभरापूर्वी लसूणचे दर गगनाला भिडले होते. साधारण हे दर ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलोवर गेले होते. (Nashik) यामुळे गृहिणीकडून भाजीच्या फोडणीत लसुणचा (garlic) वापर कमी झाला होता. मात्र आता नवीन लसूण काढणीला सुरवात झाल्याने आवक वाढली आहे. परिणामी लसणाचे दर देखील खाली आले आहेत. (Latest Marathi News)

मागील महिनाभरापूर्वी तीनशे ते चारशे रुपये किलो दराने मिळणारा लसूण सामान्य कुटूंबाच्या घरात दुर्मिळ झाला होता. सध्या लसूण काढणीला सुरवात झाली असून ओला लसूण बाजारात येऊ लागला आहे. (Madhya Pradesh) मध्यप्रदेशातून देखील लसणाची आवक वाढल्याने होलसेल मार्केटसह किरकोळ बाजारातील लसणाचे भाव खाली आले आहे. साधारण मागील आठ दिवसांपासून हे चित्र पाहण्यास मिळत असून गृहिणींना देखील दिलासा मिळाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

किरकोळ बाजारात १०० रुपये दर 

सध्या चांगल्या दर्जाचा लसूण १०० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात लसूण ३०० रुपये किलोच्या पुढे गेल्याने गृहिणीचे बजेट कोलमडले होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात मर्यादित स्वरुपात वापरला जात होता. मात्र आता आवक एकदम वाढू लागल्याने लसणाचे दर निम्यापेक्षा खाली आल्याने सर्वसामान्य गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Mulher Fort History: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Ranji Trophy 2025: सर रवींद्र जाडेजा नाशिकच्या मैदानावर खेळणार, ऋतुराज काय रणनीती आखणार?

SCROLL FOR NEXT