Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : आदिवासी बांधवांचा कळवणमध्ये चक्का जाम; पेसा भरतीसाठी आदिवासी समाज आक्रमक

Nashik News : पेसा अंतर्गत भरतीची प्रक्रिया राज्य शासनाकडून स्थगित करण्यात आली आहे. हि स्थगिती उठवून भरती प्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झाले

Rajesh Sonwane

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : राज्यातील १३ जिल्ह्यातील १७ संवर्ग पेसा नोकर भरती स्थगिती उठवून तात्काळ नोकर भरती करावी; यासाठी नाशिक शहरात मागील वीस दिवसांपासून उपोषण सुरू आहे. यावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज चक्का जाम आंदोलनाचा हत्यार आदिवासी बांधवांनी हाती घेतले आहे.

पेसा अंतर्गत भरतीची प्रक्रिया राज्य शासनाकडून स्थगित करण्यात आली आहे. हि स्थगिती उठवून भरती प्रक्रिया राबविण्याच्या मागणीसाठी आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत. यासाठी (Nashik) नाशिकमध्ये मागील वीस दिवसांपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. मात्र या आंदोलनाची दखल राज्य शासनाकडून अद्यापपर्यंत घेण्यात आली नसल्याने महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विविध ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये देखील हे आंदोलन करण्यात आले. 

नाशिक मार्ग पूर्णतः बंद 

कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा याठिकाणी देखील कळवण तालुक्यातील विविध आदिवासी संघटना, लोकप्रतिनिधी व युवकांकडून चक्का जाम करण्यात आल आहे. तालुक्यातील विविध आदिवासी संघटना, विद्यार्थी तसेच पक्षाचे पदाधिकारी कळवण कोल्हापूर फाटा या ठिकाणी जमल्याने संपूर्ण नाशिक मार्ग बंद झाले आहे. फक्त वैद्यकीय सुविधा पुरवणारे वाहने सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT