Bike Theft Saam tv
महाराष्ट्र

Bike Theft : बनावट पेपर्स तयार करुन चोरीच्या दुचाकी विक्री; २० दुचाकी जप्त करत तिघे ताब्यात

Malegaon News : नाशिकच्या मालेगाव शहरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे पोलिसांपुढे चोरट्याने पकडण्याचे मोठे आवाहन उभे होते. गाड्यांची होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस अँक्शन मोडवर होते

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : मागील काही दिवसांपासून मालेगाव शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे पोलिसांकडून या घटनेतील चोरट्यांचा शोध घेणे सुरू होते. याच दरम्यान दुचाकी चोरी विक्री करणाऱ्या तीन जणांना मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांच्याकडून २० दुचाकी जप्त केल्या आहेत. 

नाशिकच्या मालेगाव शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे पोलिसांपुढे चोरट्याने पकडण्याचे मोठे आवाहन उभे राहिले होते. दररोज गाड्यांची होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलिस अँक्शन मोडवर आले होते. पोलिसांकडून तपास सुरु असताना शहरात चोरीच्या गाड्यांचे बनावट पेपर तयार करुन त्याची विक्री करण्यात येत होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. याठिकाणी पोलिसांचे पथक रवाना झाले. 

२० दुचाकींसह तीनजण ताब्यात 

दुचाकी विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक रवाना झाले. याठिकाणी सापळा रचून मालेगाव कँम्प पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून वीस दुचाकीसह काही कागदपत्र जप्त केले आहे. पकडण्यात आलेले तिघे जण सराईत गुन्हेगार असून तपासात त्यांच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केलीय.

मोठे रॅकेट असण्याची शक्यता 

दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणारे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. दरम्यान धुळे शहरात देखील दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपी हे मालेगाव येथेच आढळून आले होते. तर मालेगाव शहर व परिसरातून चोरी होणाऱ्या दुचाकी चोरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून यात मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT