Malegaon News Saam tv
महाराष्ट्र

Malegaon News : कांद्याच्या शेतात गांज्याची लागवड; ३६ किलो गांजा जप्त, एक जण ताब्यात

Nashik News : सात महिन्यापूर्वी शेतातील चार ते पाच गुंठ्यात गांजाची लागवड केली होती. याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलिस व महसूल विभागाच्या एकत्रित पथकाने शेतात छापा टाकत पाहणी केली

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : अंमली गांजा लागवड करून छुप्या पद्धतीने त्याची शेती केली जात असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यानुसार कांद्याच्या पिकात गांजा लागवड करण्यात आल्याचे मालेगाव तालुक्यातील वडनेर- खाकुर्डी या गावात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शेतात छापा टाकत लागवड केलेला गांजा जप्त केला असून लागवड करणाऱ्या एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर येथे शिवारातील भरत म्हसदे (वय ५५) यांनी सहा ते सात महिन्यापूर्वी शेतातील चार ते पाच गुंठ्यात गांजाची लागवड केली होती. याबाबतची माहिती मिळाल्यावरून पोलिस व महसूल विभागाच्या एकत्रित पथकाने शेतात छापा टाकत पाहणी केली. यावेळी पोलीसांना सहा महिन्याचे गांजाची पिके लागवड केलेल्या अवस्थेत मिळून आले. पोलिसांनी सर्व गांजाची झाडे उपटून जप्त केली. 

सव्वादोन लाखांचा गांजा जप्त 

वडनेर- खाकुर्डी पोलिसांनी शेतात छापा टाकत गांजाची शेती उध्वस्त केली. तसेच याठिकाणी लागवड केलेल्या सुमारे २ लाख २९ हजाराचा ३६ किलो ओला गांजा जप्त केला असून याप्रकरणी गजानन कासार यांच्या तक्रारीवरून वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात भरत यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे, नायब तहसीलदार रमेश खैरे, सहायक पोलिस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

बिबट्यांनी केले कांदा पिकाचे नुकसान
नाशिकच्या कळवण तालुक्यातील एकलहऱ्यामध्ये साहेबराव गांगुर्डे यांच्या शेतात तीन बिबट्यांचा मुक्तसंचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे या बिबट्यांनी त्यांच्या कांदा पिकांचेही नुकसान केले. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

SCROLL FOR NEXT