nashik, nashik maha palika, school, nashik mahapailaka education department Saam Tv
महाराष्ट्र

Action Against Illegal School : ३ अनधिकृत शाळांना पालिकेने ठाेठावला ९.७८ कोटींचा दंड, एका संस्थेवर गुन्हा दाखल

या संस्थांची शिक्षण विभाग आणखी सखाेल चाैकशी करीत आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने अनाधिकृत शाळा बंद न केल्याने संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा शिक्षण संस्थांविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Maharashtra News)

नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पाहणीत बेकायदेशीर आढळलेल्या शाळा चालवणाऱ्या नाशिकच्या ३ शिक्षण संस्थांना ९ कोटी ७८ लाखांचा दंड ठाेठावण्यात आला. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी या संस्थांना शाळा बंद करण्याचे आदेश दिले.

दरम्यान यातील तिरुपती एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टची एमराल्ड हाईट्स पब्लिक स्कूल (emerald heights public school nashik) शिक्षण संस्थेने शिक्षण विभागाचा आदेश पाळला नाही. त्यामुळे संबंधित शाळेच्या संचालकांविरोधात नियमांचा भंग करून शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांत दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा शिक्षण संस्थेविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT