saam tv
महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela: नाशिकमध्ये वृक्ष कत्तलीचा कुंभ; कुंभमेळ्यासाठी हजारो वृक्षांचा बळी, पर्यावरणप्रेमींचा आक्रोश

Nashik Kumbh Mela : तपोवनातील वृक्षतोडीनंतर आता गंगापूर रोडवरील वृक्ष कत्तलीमुळे नाशिककर चांगलेच आक्रमक झालेत. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये हजारो वृक्षांचा कसा बळी घेतला जातोय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

नाशिककरांच्या डोळ्यात दाटलेला हा अश्रूचा पूर आहे. गंगापूर रोडवरील 300 ते 500 वर्ष जुन्या झाडांसाठीचा. दक्षिण काशी, गोदावरीचा उगम आणि निसर्गाचा वरदहस्त असणाऱ्या गंगापूर रोडवर ज्या झाडांनी अनेक वर्ष वाटसरुंना सावली दिली. त्याच झाडांवर व्यवस्थेच्या एका निर्णयानंतर रात्रीच कुऱ्हाड चालवण्यात आलीय.

खरतर गंगापूर रोडवरील या झाडांची कत्तल होऊ नये म्हणून पर्यावरणप्रेमी चांगलेच आक्रमक झाले होते. कुणी झाडाला बिलगलं तर कुणी झाडावर चढून बसलं. वृक्ष तोडताना आपल्या मुलांचा विचार करा, असे फलकही अनेकांनी झळकावले. मात्र प्रशासनाच्या रेट्यामुळे अखेर झाडांवर कुऱ्हाड चावलवी गेलीच. आणि तपोवनानंतर नाशिकमध्ये पुन्हा वृक्ष कत्तलीचा कुंभ रंगला.

नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू आहे. रस्ते रुंद होत आहेत, पूल बांधले जात आहेत. पण हे करताना नाशिकची 'ग्रीन सिटी' पूर्णपणे उद्ध्वस्त केली जातेय का? फक्त तपोवनच नाही, तर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यात आज झाडांची कत्तल सुरू आहे. त्यामुळे "विशाल रस्ते बनतील, पण त्यावरून चालणाऱ्या माणसांना उद्या ऑक्सिजन कुठून मिळणार?" हा प्रश्न नाशिककर विचारू लागलेत.

हरित लवादानं 28 एप्रिलपर्यंत वृक्ष तोडीला स्थगिती देऊन पर्यावरण प्रेमींना काही काळाकरता दिलासा दिलेला असला तरी रस्ता रंदीकरणाच्या नावाखाली निसर्ग ओरबाडण्याचा अधिकार प्रशासकीय यंत्रणेला कुणी दिला. हा खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT