Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : धरण परिसरात पर्यटनासाठी आला अन् जीव गमावला; पोहताना धरणाच्या ओवरफ्लोमध्ये बुडाला

Nashik News : अतिक खान हा त्याच्या तीन मित्रांसोबत इगतपुरी तालुक्यातील भावली धरण येथे पोहण्यासाठी आला होता.

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

इगतपुरी (नाशिक) : सुटी असल्याने सुटीचा आनंद घेण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेले असताना पोहण्यासाठी धरणात उतरलेल्या २४ वर्षीय युवक बुडाला आहे. पोहत असताना धरणाच्या ओव्हरफ्लोमध्ये गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

म्हाडा वर्सोवा (मुंबई) येथील अतिक नाशिर खान असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अतिक खान हा त्याच्या तीन मित्रांसोबत (Igatpuri) इगतपुरी तालुक्यातील भावली धरण येथे पोहण्यासाठी आला होता. तिघेजण पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र भावली धरणाजवळील ओव्हरफ्लोच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला असल्याची माहिती त्याच्या मित्रांनी इगतपुरी पोलिसांना दिली होती. 

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पानबुड्या व्यक्तींकडून शोध कार्य सुरू करण्यात आले होते. दरम्यान आज दुपारी शोधकार्याला यश आले आहे. तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. पर्यटन करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपल्यासह सर्वांची काळजी घेऊन पाण्यात जायला पाहिजे; अशी अपेक्षा स्थानिक गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT