nashik crime news Saam tv news
महाराष्ट्र

Nashik: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा, अश्लील व्हिडिओ काढले अन् बायकोला डान्सबारमध्ये नाचवलं

Nashik Crime News: नाशिकमध्ये पतीने पत्नीला गुंगीचं औषध देऊन अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन डान्सबारमध्ये नाचण्यासाठी जबरदस्ती.

Bhagyashree Kamble

  • नाशिकमध्ये पतीने पत्नीला गुंगीचं औषध देऊन अश्लील व्हिडिओ शूट केल्याचा प्रकार

  • व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन डान्सबारमध्ये नाचण्यासाठी जबरदस्ती

  • पती पवन गाडेकर व मित्र अक्षय गांगुर्डेवर गुन्हा दाखल

  • पंचवटी पोलिसांकडून पुढील तपास सुरू

पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. पतीनं पत्नीला गुंगीचं औषध देऊन तिचे अश्लील व्हिडिओ शुट केले. नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच डान्सबारमध्ये नाचण्यास भाग पाडले. पतीच्या याच त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच नराधम पतीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्ररीवरून २ आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

पवन गाडेकर असे आरोपी पतीचे नाव आहे. नवरा- बायको नाशिकमधील हिरावाडी परिसरात राहत होते. पती आणि पत्नीमध्ये वारंवार भांडणं सुरू होती. काही दिवसांपूर्वी पतीनं पत्नीचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ शूट केले होते. नंतर याच अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या आधारे त्यानं बायकोला फसवण्याचा प्रयत्न केला.

त्यानं बायकोला तिचे अश्लील फोटो दाखवले आणि व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच नवरा वारंवार बायकोला शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याची माहिती आहे. त्यानं पीडितेला डान्स बारमध्ये नाचण्यास भाग पाडले. पतीच्या याच त्रासाला कंटाळून तिनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

तिनं नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात पती आणि आणखी एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पती पवन गाडेकर आणि त्याचा मित्र अक्षय गांगुर्डे यांच्यावर गुन्हा केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी २ व्यक्तीविरोधात गुन्हा केला आहे. पुढील तपास पंचवटी पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

Cricketer Death: वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका, 22 वर्षीय क्रिकेटपटूचा मृत्यू

Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदावरून मोठी हलचाल? सुनील तटकरे यांच्या विधानामुळे चर्चेंना विधान|VIDEO

Shirish Gawas : लोकप्रिय युट्यूबरचा अकाली मृत्यू; वयाच्या ३३ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, चाहत्यांवर शोककळा

SCROLL FOR NEXT