Family Members Strangle Man to Death in Nashik Over Drunken Brawl Saam Tv news
महाराष्ट्र

Nashik: दारूच्या नशेत शिवीगाळ अन् मारहाण, आई-वडिलांनी ओढणीने आवळला मुलाचा गळा; परिसरात खळबळ

Man Strangled to Death by Own Family: नाशिकच्या सातपूरमधील शिवाजीनगर येथे दारूच्या नशेत घरगुती वादातून तरुणाचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आला. आई-वडील व मेव्हणाला पोलिसांनी अटक केली आहे.

Bhagyashree Kamble

दारूच्या नशेत घरच्यांशी वाद घालणाऱ्या तरुणाचा ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली असून, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आई, वडील आणि बहिणीच्या नवऱ्याला अटक केली आहे. या घटनेची माहिती गावात पसरताच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव विशाल पाटील (वय वर्ष ३४) असून, तो सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत घरी परतला होता. घरी आल्यानंतर त्याने वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील आणि मेव्हणा उमेश काळे यांच्यावर शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून, घरात तांडव घातला. त्याने घरातील भांडी घेतली आणि विकायला घराबाहेर पडत होता. हे पाहताच आई, वडील आणि नंदोई उमेश काळे या तिघांना राग अनावर झाला. त्यांनी विशालला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर ओढणीच्या सहाय्याने गळा आवळला.

आवाज दाबण्याकरिता आई शशिकला पाटील हिने तोंडावर उशी ठेवली. मृतदेह काही वेळ घरातच ठेवून त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपास करून विशालला मृत घोषित केलं. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी विशाल पाटील याचे वडील गोकुळ पाटील, आई शशिकला पाटील आणि मेव्हणा उमेश काळे या तिघा आरोपीेंना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT