Voting Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Vidhan Parishad: नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान, पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार

नाशिक पदवीधर निवडणुकीत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आज मतदान होत आहे. निवडणुकासाठी पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

नाशिक पदवीधर निवडणुकीतील सुरुवातीपासूनच ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिकसह अमरावती पदवीधर, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षण मतदारसंघात देखील आज मतदान होणार आहे. (Latest News Marathi)

नाशिक पदवीधर निवडणुकीत नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यात मतदान होणार आहे. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक १४७ मतदान केंद्र तर नाशिक जिल्ह्यात ९९ मतदान केंद्र आहेत. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.

नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आज बजावणार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १ लाख १५ हजार ६३८ मतदार, नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यात ३५ हजार ५८, धुळ्यात २३ हजार ४१२ तर नंदुरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ मतदार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचे घराच्या छतावरून पडून निधन; मनोरंजन विश्वात शोककळा

Maharashtra Live News Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये दाखल

नाशिकच्या तपोवनात जादूटोणा? झाडांना अरबी भाषेच्या चिठ्ठ्या बांधून.. नेमकं प्रकरण काय? VIDEO

Crime : पुण्यात वेश्या व्यवसाय आणि गांजा विक्री सर्रास सुरू, गुन्हेगारांना संरक्षण कवच कोणाचं?

'साधूंच्या नावाखाली संधीसाधूपणा करू नका', तपोवन वृक्ष तोडप्रकणात राज ठाकरे संतापले

SCROLL FOR NEXT