Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : जिंदाल कंपनीला लागलेली आग ३२ तासांनतरही कायम; परिसरात धूराचे लोळ

नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग ३२ तासांनतरही कायम आहे.

अभिजीत सोनावणे

Nashik News : नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला लागलेली आग ३२ तासांनतरही कायम आहे. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीचे लोळ परिसरात अजूनही आहे. तर साहित्याला लागलेली आगही अद्याप आहे. (Latest Marathi News)

जिंदाल कंपनीतील अग्नितांडव दुसऱ्या दिवशीही कायम आहे. ३२ तासानंतरही परिसरात अद्यापही धुराचे लोट दिसत आहे. अग्निशमन दलाचे जवान आज पुन्हा फोमच्या मदतीनं आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. कंपनीच्या परिसरातील कच्चा माल आणि अन्य साहित्यााला लागलेली आग कायम आहे.

मुंबई-नाशिकच्या महामार्गावरून अजूनही आगीच्या ज्वाळा दिसत आहे. आज, सोमवारी संध्याकाळपर्यंत आग विझेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्यापही आगीवर नियंत्रण नाही. कालच्या तुलनेत आगीची तीव्रता काहीशी कमी झालेली असली, तरी आग कायम आहे.

जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत मृत झालेल्या दोन महिला कर्मचारी होत्या. महिमा आणि अंजली असे दोघांची नावे आहे. महिमा यांचे वय २० होते तर अंजली यांचे वय २७ असून दोघांचाही या आगीत मृत्यू झाला आहे. इतर दोघांवर उपचार सुरू आहेत. दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत आहे. तर नाशिक जिंदाल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाणार आहे.

मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत

नाशिकच्या इगतपुरीमधील जिंदाल कंपनीला भीषण आग लागली. जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन जखमी महिलांचा मृत्यू झाला असून या घटनास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. जिंदाल कंपनीला आग लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'सदर घटना अतिशय गंभीर आहे. ज्वलनशील पदार्थामुळे आग भडकली. आग विझविण्यासाठी आपली यंत्रणा काम करत आहे. जखमी कामगारांमध्ये दोन जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे'. तसेच मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: जिद्द, मेहनत आणि चिकाटीची कहाणी! जैनवाडीच्या मनोजकुमार जमदाडे यांची MPSC मध्ये दमदार झेप

राघव चड्ढांनी 'आप' सोडून भाजप का निवडला? त्यांच्याकडे कोणते ३ पर्याय होते? स्वतःच सांगितली इनसाइड स्टोरी

बीडमध्ये मैत्रीचा रक्तरंजित शेवट; पत्नीचे आक्षेपार्ह फोटो का दाखवले? म्हणत होमगार्डची निर्घृण हत्या

मोठी बातमी! राज्यात होणार 5 नवीन जिल्हे; लडाखच्या उपराज्यपालांची घोषणा

Maharashtra News Live Update: जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका, तापमानाचा पार 42.10 अंशावर

SCROLL FOR NEXT