Nashik: तापमानाचा पारा घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी; पारा कमालीचा घसरला Saam Tv
महाराष्ट्र

Nashik: तापमानाचा पारा घसरल्याने नाशिककरांना हुडहुडी; पारा कमालीचा घसरला

अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि शनिवारपासून पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या दिशेने सुरू असलेले मार्गक्रमण यामुळे शहराच्या वातावरणामध्ये या ४ दिवसामध्ये कमालीचा बदल झाला

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक: अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि शनिवारपासून पाकिस्तानात (Pakistan) उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या (Gujarat) दिशेने सुरू असलेले मार्गक्रमण यामुळे शहराच्या (city) वातावरणामध्ये या ४ दिवसामध्ये कमालीचा बदल झाला आहे. या बदलामुळे नाशिककर (Nashik) देखील आश्चर्यचकित झाले आहेत. रविवारी दिवसभर नागरिकांना सूर्यदर्शन देखील दुर्लभ झाले होते. सोमवारी सकाळी उशिराने का होईना, सूर्यदर्शन घडले होते.

हे देखील पहा-

तसेच वातावरणात धुके आणि धुरक्यांचे प्रमाण देखील घटले आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. वाऱ्याचा (wind) वेग सोमवारी मंदावला होता. मात्र, पारा कमालीचा घसरल्यामुळे थंडीची तीव्रता प्रचंड वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला आहे. सोमवारी सकाळी हवेमध्ये आर्द्रता आणि बाष्पचे देखील प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून आले आहे. अंधुक वातावरण (Atmosphere) देखील निवळले आहे. सकाळी आर्द्रता ६४ टक्के इतकी होती.

शहराच्या हवेच्या गुणवत्तेमध्ये देखील काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. दिवसभर आकाश निरभ्र होते. दुपारपासून कडक ऊन पडले होते. गेल्या वर्षी १७ जानेवारी रोजी थंडीचा असाच कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. त्या दिवशी देखील शहराचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली होती. २३ डिसेंबर रोजीसुद्धा पारा ८.२ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककर चांगलेच गारठले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात कोयता, हातोड्याने मारहाण; कॉलेजमध्ये झाला राडा! हाणामारीचे Video Viral

Shahapur : अखेर चौथ्या दिवशी सापडला युवकाचा मृतदेह; भारंगी नदीत बुडून झाला मृत्यू

Skin Care: सतत खोट्या आयलॅशेस लावण्याने होतील हे नुकसान, वेळीच व्हा सावधान

Body changes after cancer: कॅन्सर झाल्यानंतर शरीरामध्ये कोणते मोठे बदल दिसून येतात?

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

SCROLL FOR NEXT