Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Nashik News : मुसळधार पावसाने महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला; नाशिक शहरासह ८० गावांचा वीज पुरवठा खंडित

Nashik News : नाशिक शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी पावसाला सुरवात झाली. तर मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : नाशिकच्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला पावसाचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे वीजनिर्मिती केंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने नाशिक शहरासह ७० ते ८० गावांमधील वीज पुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम सुरु आहे. 

नाशिक (Nashik) शहरासह परिसरात रविवारी सायंकाळी पावसाला सुरवात झाली. तर मध्यरात्रीच्या सुमारास  मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटला आहे. वीजनिर्मिती केंद्रातील १३२ केव्ही सबस्टेशनमधील महा पारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर फुटल्याने वीज पुरवठा खंडित झाली आहे. यामुळे नाशिक शहरातील काही भागासह ७० ते ८० गावांचा वीज पुरवठा रात्रीपासून खंडित आहे. 

वीज पुरवठ्यासाठी सबस्टेशनवर अवलंबून असलेल्या नाशिकरोड, जेळरोड, दसक, देवळाली कॅम्प, सामानगावसह ७० ते ८० गावांचा वीजपुरवठा खंडित आहे. संकलनानंतर महापारेषणकडून ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र वीज पुरवठा कधीपर्यंत सुरळीत होणार? याबाबत अनिश्चितता आहे. यामुळे या भागातील नागरिकांना अंधारात राहावे लागणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

Raigad Mahad MIDC Blast: रायगडच्या महाडमध्ये भीषण स्फोट! परिसरात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत हादरे; मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT