Earthquake tremors shake Nashik district; cracks seen in houses, residents rush outdoors in panic saam tv
महाराष्ट्र

नाशिक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, 10 दिवसांत भूकंपाचे 5 धक्के, घरांना तडे

Nashik Earthquake Series 5 Tremors In 10 Days: नाशिकमधून मोठी बातमी समोर आलीये... जिल्ह्यात वारंवार होत असलेल्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र, नाशिकमध्ये वारंवार भूकंप का होतोय? जमिनीखाली नेमकं काय घडतंय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Rohit Kadam

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. गेले काही दिवस ग्रामीण भागात भूकंपाचे धक्के जाणवलेले असताना आता शहरी भागातही धक्के जाणवू लागल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिक जिल्ह्यात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. घाबरुन नागरीक घराबाहेर पडले.

दिंडोरी तालुक्यातील भनवड भूकंपाचं केंद्रबिंदू ठरलंय. अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. जिल्ह्यातील कोणकोणत्या भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवलेत? ते पाहूयात...

नाशिकच्या 'या' भागांत धक्के

शहरी भागात

पंचवटी

म्हसरुळ

आडगाव

मखमलाबाद

ग्रामीण भागात

शिलापूर

सिद्ध पिंप्री

नांदूरशिंगोटे

चास

दिंडोरी

कळवण

पेठ

सुरगाणा

या चार तालुक्यात भुकंपाचे धक्के जाणवलेत.

विशेष म्हणजे, गेल्या 10 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये भूकंपाची मालिकाच सुरू आहे.

नाशिक जिल्ह्यात भूकंपाची मालिका

दिनांक केंद्र तीव्रता (रिश्टर स्केल)

30 जुलै सुरगाणा 3.8

31 जुलै दिंडोरी 3.0

5 ऑगस्ट त्र्यंबकेश्वर 3.0

6 ऑगस्ट सुरगाणा 3.6

8 ऑगस्ट सुरगाणा 4.3

इतकच नव्हे तर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून भविष्यात आणखी एका धक्क्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. जिल्ह्यात अनेक भागांत वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत ? असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. जिल्ह्यातील भूकंपामागे भूगर्भातील हालचाली आणि अनेक कारणे वर्तवली जात असली तरी पुढील काळात नाशिककरांना नव्या आव्हानाला सामोरं जावं लागण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चायनीज फूड स्टॉल्स तुकाराम मुंढेंच्या रडारवर? चायनीज खाद्यपदार्थांकडे लक्ष देण्याचा विचार

Maharashtra News Live Update: आंबोली धबधब्यावर साप चावल्यामुळे हम्पी येथील पर्यटकांचा मृत्यू

भाजपच्या दिग्गज नेत्याचे अपघातात निधन; आमदार, खासदार आणि महापौर दौरा रद्द करून रुग्णालयात दाखल, राजकारणात शोककळा

श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियात दिग्गज क्रिकेटपटूची एंट्री; साई सुदर्शन संघातून का झाला आऊट?

मुंबईत मोठी कारवाई; ४४ बांगलादेशी नागरिकांच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT