MLC Election Mahayuti Nashik Teacher Constituency 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्ये जुंपली? दराडेंनी भरला उमेदवारी अर्ज

MLC Election Mahayuti Nashik Teacher Constituency: शिवसेनेचे उमेदवा किशोर दराडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री दादाजी भुसे होते. नाशिकची जागा महायुतीच्या वरिष्ठांनी शिवसेनेला सोडली असल्याचं भुसे म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत सोनावणे, साम प्रतिनिधी

नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट निर्माण झालाय. शिंदे गट आणि अजित पवार गटात जुंपलीय. दोन्ही पक्षांकडून उमेदवार देण्यात आल्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अजित पवार गटाच्या उमेदवाराने विभागीय कार्यालयात अर्ज भरला. त्यानंतर आता शिवसेनेच्या उमेदवारानेही अर्ज भरलाय. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यासह किशोर दराडे उमेदवारी अर्ज दाखल केला.

किशोर दराडे यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. याआधी अजित पवार गटाकडून देखील महेंद्र भावसार यांनी AB फॉर्मसह महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर भाजपच्या विवेक कोल्हे राजेंद्र विखे पाटील आणि धनराज विसपुते यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. यामुळे नाशिक विभागीय शिक्षक लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्येच लढत लागल्याचं दिसत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सुटलीय. आम्ही किशोर दराडे यांचा फॉर्म एबी फॉर्म भरलाय. शिवसेनेला ही जागा सुटलेली असल्यामुळे महायुतीमधील इतर पक्षांचे उमेदवार माघार घेतील. अजून माघारीची वेळ बाकी आहे, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. माघारीच्या वेळी इतरांनी फॉर्म भरला असेल तर ते माघार घेतील. नाशिकची जागा महायुतीच्या वरिष्ठांनी शिवसेनेला सोडलीय . तर किशोर दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, अशी प्रतिक्रिया दादाजी भुसे यांनी दिलीय.

माझ्या ६ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात तीन मुख्यमंत्री झाले. पण आमच्या शिक्षकांसाठी सर्वात जास्त चांगलं काम एकनाथ शिंदे यांनी केलं. मी मागच्या वेळी देखील अपक्ष उमेदवार होतो, ठाकरेंनी मला पाठिंबा दिला होता. येत्या २७ जूनच्या अधिवेशनात आमच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना मिळणार आहे. महायुतीमध्ये फूट पडली असं काही नाही माघारीला बराच वेळ आहे. १२ जूनला सर्व चित्र स्पष्ट होईल. मी कधीच ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली नाही. मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना भरभरून दिलं, शिक्षकांची चूल पेटवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केल्याची प्रतिक्रिया दराडे यांनी अर्ज भरल्यानंतर दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT