Leopard Video Saam TV
महाराष्ट्र

Nashik Leopard Video: नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम; काळजात धडकी भरवणारं दृश्य CCTV कॅमेऱ्यात कैद

Leoapard in Nashik Dari Matori Area: नाशिकमध्ये दरी मातोरी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. नाशिकमध्ये घराच्या आवारात बिबट्या वावरताना दिसत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकमध्ये बिबट्यांचा संचार दिवसेंदिवस वाढत आहे. जंगल कमी झाल्यामुळे त्यांचा मानवी वस्तीत वावर जास्त वाढला आहे. बिबट्या खुलेआम रस्त्यावर वावरताना दिसत आहे. नाशिकमध्ये दरी मातोरी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. बिबट्या रात्रीच्या वेळी स्थानिक नागरिकांच्या घराबाहेर खुलेआम वावरत असलेला दिसत आहे.

नाशिकमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या दिसत असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, आता बिबट्या थेट घराच्या अंगणात दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोकुळ बोडके यांच्या घराबाहेर बिबट्या वावरत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला आहे. रात्री घरात सर्वजण झोपले असताना बाहेर बिबट्याचा वावर होता.

गेल्या काही दिवसांपासून नागरी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. या घटनेनंतर दरी मातोरी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. बिबट्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रात्री बिबट्या घराच्या आजूबाजूला वावरताना दिसत आहे. घराच्या अंगणात असलेल्या फरशीवरदेखील बिबट्याचा वावर दिसत आहे. बिबट्या अगदी पाळीव कुत्रा असल्यासारखा वावरताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक वस्तीत बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील ढोंग शिवारातील शेतात मका कापणी करत असताना बिबट्याचे पिल्ली आढळून आले होते. हे पिल्लू घेऊ जाताना बिबट्या मादी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Shivali Parab : "वेड तुझे..."; शिवाली परबचा 'तो' VIDEO पाहून बॉलिवूड अभिनेत्यानं केलं कौतुक

RITES Recruitment: खुशखबर! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; ६०० पदांसाठी भरती; आजच अर्ज करा

राजकारणात नवा भूकंप! माणिकराव कोकाटेंच्या घरात भाजपचा झेंडा, लहान भावाकडून ठाकरेंना राम-राम

SCROLL FOR NEXT