Nashik Crime News Saamtv
महाराष्ट्र

Nashik Crime News: लहान मुलांच्या भांडणाचा वाद.. दोघा भावांना टोळक्याने घरात घुसून संपवलं; नाशिक शहरात खळबळ

Nashik Ambad News: काही महिन्यांपूर्वी झालेल्या लहान मुलांच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तरुणांवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Gangappa Pujari

तबरेज शेख, प्रतिनिधी...

Nashik Crime News: काही महिन्यांपूर्वी लहान मुलांच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी तरुणांवर घरात घुसून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्य अंबड परिसरात झालेल्या या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)

नाशिकच्या (Nashik) अंबड परिसरात चुंचाळे शिवारात ही धक्कादायक घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी लहान मुलांची भांडणे झाले होते. याच भांडणाचा वचपा काढण्यासाठी चुंचाळेतील सहा ते सात जणांच्या टाेळक्याने संजीवनगरात एका तरुणाच्या घरात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात छातीवर वार केल्याने मिराज खान (वय १८) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला .

यावेळी भांडण साेडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा चुलत भाऊ इब्राहिम हसन शेख (वय २३, रा. संजीवनगर) याच्यावरही हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता, ज्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुदैवाने या हल्ल्यावेळी तिसरा भाऊ पळून गेल्याने त्याचा जीव वाचला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या भयंकर घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सध्या या हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ही सगळी घटना परिसरातील महिला आणि लहान मुलांसमोर झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

SCROLL FOR NEXT