nashik, crime news, mns saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : पक्षप्रवेशासाठी पैसे मागितले, युवकाला संपवला; नाशकात एक अटकेत

पाेलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर युवकास घेतलं ताब्यात.

Siddharth Latkar

- तबरेज शेख

Nashik Crime News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (mns) प्रवेश करून चांगले पद देतो असे सांगून पंधरा हजार रुपयांची मागणी केल्याने तिघा संशयतांनी प्रवीण दिवेकर (Pravin Divekar) या तरुणाचा (youth) खून केल्याचे पाेलिस (police) तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयितांस अटक (arrest) केली आहे. (Maharashtra News)

प्रवीण दिवेकर या युवकाचा नुकताच गळा चिरून खून करण्यात आला होता. जेलरोड येथे ही घटना घडली हाेती. एका घरात पार्टी करत असताना दिवेकर याने मनसेमध्ये प्रवेश देण्यासाठी पंधरा हजारांची मागणी केली. त्यानंतर संशयित आणि दिवेकर यांच्यात चर्चा सुरु झाली. त्यातून वाद झाला.

यावेळी संशयित तुषार पवार यांनी दिवेकर यास पैसे नकार दिल्याने दोघांमधील वाद वाढला. त्यानंतर संशयित तुषार पवार याने त्याच्या मित्राच्या मदतीने दिवेकरचा खून केला. यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे माहिती काढून संशयितांचा माग काढला.

त्यानंतर तुषार पवार याची पाेलिसांनी कसून चौकशी केली. त्यात त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान या घटनेत एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची माहिती प्रशांत बच्छाव (पोलिस उपआयुक्त, गुन्हे शाखा) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Advice : शत्रूवर विश्वास ठेवणं एकवेळ चालेल, पण या ७ लोकांपासून आजपासूनच राहा दूर

Maharashtra News Live Update: जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 14वा दिवस; तोडगा न निघाल्याने बदनापूरमध्ये मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Diabetes Vegetable: भेंडी की कारले? डायबिटीजसाठी कोणती भाजी चांगली?

Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?

मोरपंखाची थीम; गणपती मखरसाठी सुंदर आणि आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT