Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime: बहिणीकडे वाईट नजरेने बघितले म्हणून वाचमनची हत्या

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : नाशिक शहरात मागील तीन– चार दिवसात दुसरी खूनाची घटना घडली (Nashik) आहे. अगदी शुल्‍लक कारणांवरून या दोन्‍ही घटना घडल्‍या असून, आजच्‍या घटनेत बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्‍याच्‍या कारणावरून वॉचमनला (Crime News) जीव मारले आहे. (Live Marathi News)

म्हसरूळ येथील वाढणे कॉलनीतील हनुमान मंदीराजवळील बांधकाम साईट येथे प्रकार घडला आहे. बांधकाम साईटवर असलेले वॉचमन व बिगारी यांच्यातील वादातून हत्या (Crime) झाली. दारूच्या नशेत बांधकाम साईडवरील बिगारी असलेल्‍या कामगाराने माझ्या बहिणीकडे का बघीतले यावरून बिगारी व वॉचमन यांच्‍यात वाद झाला. या वादात वॉचमनला जीवे मारल्‍याची घटना घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तीन दिवसात दुसरी हत्‍या

नाशिकमध्ये शुल्लक कारणावरून तिन दिवसांत दुसरी हत्या झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 2000 हजार रूपयांसाठी काकाने पुतण्याची हत्या केली होती. तर आज बहिणीकडे वाईट नजरेने बघितल्‍याचे कारण ठरले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी संजीव सन्याल यांची नियुक्ती

Jammu And Kashmir : निवडणूक निकलाआधी दहशतवाद्यांचा डाव उधळला; भारतीय लष्कराने केली शस्त्रे आणि स्फोटके जप्त

Diabetes Control: मधुमेह नियंत्रित ठेवायचाय? 'या' रंगाचे तीळ ठरतील फायदेशीर...

Maharashtra Politics: बच्चू कडूंना 'जोर का झटका', आमदार राजकुमार पटेल शिंदे गटाच्या वाटेवर?

India vs Pakistan: आज जिंकावंच लागेल! पाकिस्तानविरूद्ध 'या' चुका करणं टीम इंडियाला पडणार महागात

SCROLL FOR NEXT