Crime
Crime Saam TV
महाराष्ट्र

नाशकात चोरांचा सुळसुळाट; एकाच दुकानाची १२ दिवसात दुसऱ्यांदा चोरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक रोड परिसरातील देवी चौकात मोबाईल दुकान फोडून चोरीची घटना समोर आली आहे विशेष म्हणजे बारा दिवसात याच दुकानात चोरीची ही दुसरी घटना असल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही चोरीच्या घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्या आहेत. नाशिकरोड (Nashik) येथील फोन सर्विस या मोबाईल दुकानात पुन्हा एकदा चोरट्याने हात साफ केल्याची घटना समोर आली आहे.

चोरी झाल्याने व्यवसायिकांमध्ये भीतीच वातवरण पसरले आहे. गेल्या 12 दिवसांपूर्वी याच दुकानात चोरट्याने दुकानाच्या वरील पत्रा फोडून आत प्रवेश करत चोरी केली होती.या घटनेत दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. चोरी करताना तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. पुन्हा त्याच पद्धतीने पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास चोरी झाल्याचे समोर आले आहे.

हे देखील पाहा -

यावेळी मात्र या चोरट्याने चोरी करताना तोंडावर पिशवी टाकून अनोखी शक्कल लढवत चोरी केली असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे.तर वाढत्या चोऱ्या लक्षात घेता पोलिसांनी गस्त वाढून घडलेल्या घटनेतील चोराला त्वरित बेड्या ठोकाव्यात अशी मागणी येथील व्यापारी करत आहेत.

दरम्यान एकाच दुकानात सारख्याच पध्दतीने दुसऱ्यांदा चोरी झाल्यामुळे या चोरांना पोलिसांचेच अभय तर नाही ना अशी चर्चा परिसरात सुरू आहे. वारंवार अशा चोरीच्या घटना घडत असल्याने व्यवसायिकांनाच आता पहारा देण्याची वेळ आली असून अशा चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता येथील व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

Mumbai News : कर्जाचे हफ्ते थकलेल्या वाहनाची परस्पर केली विक्री; व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांकडून दोघांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्रातील कारागृहांत चाललंय तरी काय? कळंब्यात पुन्हा 10, भंडा-यात 1 मोबाईलसह बॅटरी जप्‍त

Loksabha Election: निलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांकडून एका कुटुंबाला मारहाण? सुजय विखेंचा आरोप; नगरमध्ये राजकारण तापलं!

SCROLL FOR NEXT