Nashik Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : बदला घेण्याच्या भावनेतून हत्या; चौघे ताब्यात, अल्पवयीन मुलाचाही सहभाग

बदला घेण्याच्या भावनेतून हत्या; चौघे ताब्यात, अल्पवयीन मुलाचाही सहभाग

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: बाेधलेनगरात घडलेली तुषार चावरेची हत्या ही मारहाणीचा बदला घेण्यासाठी झाल्याचे समाेर आले आहे. (Nashik) घटनेनंतर काेणताही मागमूस नसतानाही उपनगर पाेलिसांनी (Police) काही तासांतच या हत्येत सहभागी असलेल्या मुख्य सूत्रधारासह त्याच्या साथीदाराला पाठलाग करुन अटक केली आहे. (Latest Marathi News)

नाशिक शहरात शनिवारी रात्री साडेसात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास पुणे राेडवरील बाेधलेनगर जवळून तुषार एकनाथ चावरे (वय १८, रा. सुयोगनगर, बोधलेनगर) हा मित्र सचिन गरुड याच्यासह दुचाकीवरुन जात असताना संशयित मोपेड बाईकवरुन आले. त्यांनी चावरेला दमदाटी करत हत्यारे दाखविली. त्यामुळे चावरे भेदरला. (Crime News) स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो काम करत असलेल्या चंद्रमा टिंबर मार्टकडे पळाला. त्यानंतर संशयितांनी त्याचा पाठलाग करुन चाॅपर व धारदार हत्यारांनी डाेक्यावर, पाेटावर, पाठीवर धारदार हत्यारांनी सपासप वार करून खून केला. त्यानंतर संशयित पळून गेले.

पाठलाग करून पकडले 

पोलिसांनी डीबी पथकास संशयितांना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथक रवाना झाले असता संशयित मारेकऱ्यांबाबत कुठलाही सुगावा नसतांना हवालदार विनोद लखन व शिपाई जयंत शिंदे यांना गाेपनीय माहिती मिळाली. संशयितांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्याचवेळी पाेलिस आल्याचे समजताच माेपेडवरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाेलिसांनी पाठलाग करुन तिघांना ताब्यात घेतले. सुलतान मुख्तार शेख (वय २१), रोहीत मनोहर पगारे (वय १८, दाेघे रा. गांगुर्डे चौक, पंचशील नगर, उपनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे असून येथेच राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, घटनेतील मृत व संशयित यांच्यापैकी कुणाचे मुलीवर प्रेम वा छेडछाडीतून ही हत्या झाली आहे का? हे तपासानंतर समाेर येणार

सुलतानला चावरेची मारहाण
प्रेमसंबंध व छेडछाडीच्या वादातून गेल्या पंधरा दिवसांपूर्वी गुंडगिरीची भाषा वापरणाऱ्या मृत चावरे याने सुलतानला मारहाण केली हाेती. त्यामुळे ताे या मारहाणीला प्रत्युत्तर देण्याची वाट पाहत हाेता. त्यातच दाेघांचे काही दिवसांपूर्वी इंदिरानगर भागात भांडणही झाले हाेते. त्यामुळे पूर्वी झालेली मारहाण व भांडणाचा बदला घेण्यासाठी संशयितांनी चावरेला संपवायचे असा निश्चय करत मद्यपान केले. त्यानंतर केलेल्या प्लॅनिंगनुसार त्याला गाठत हत्या केली. मृत चावरे हा देखिल गुन्हेगारी पार्श्वभूमीचा हाेता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

SCROLL FOR NEXT