Nashik Crime News saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : नाशिकमध्ये खळबळ; दिवसाढवळ्या वृद्ध महिलेची हत्या, घरात घुसून केला हल्ला

Nashik News : नाशिक शहरातील पंचवटी परिसरातील गुलमोहर कॉलनीत सदर वृद्धा वास्तव्यास होती. त्या महिलेसोबत तिची एक ६० वर्षीय वृद्ध मुलगी असून या दोघी मायलेकीच राहायच्या

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: घरात एकटी असलेल्या वृद्धेची धारदार शास्त्राने वर करत हरया करण्यात आल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरातील गुलमोहर कॉलनीमध्ये घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कुसुम एकबोटे (वय ८०) असे घटनेत मृत झालेल्या वृध्येचे नाव आहे. 

नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी परिसरातील गुलमोहर कॉलनीत सदर वृद्धा वास्तव्यास होती. त्या महिलेसोबत तिची एक ६० वर्षीय वृद्ध मुलगी असून या दोघी मायलेकीच राहायच्या. तसेच ह्या निवासस्थानातील वरच्या मजल्यावर भाडेकरू म्हणून वास्तव्य करीत होत्या. दरम्यान घरात घुसून धारधार शास्त्राने वर करून वृद्धेची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी म्हसरूळ पोलीस, शोंन पथक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून (Nashik Crime News) पोलिसांकडून तपस सुरु करण्यात आला आहे. 

हत्येचे कारण गुलदस्त्यात 

८० वर्षीय वृद्ध महिला व तिची वयस्कर मुलगी असे दोघे भाड्याच्या रूममध्ये राहत असल्याने हा खून कोणी व का केला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वृद्धेची हत्या करून आरोपी फरार झाले आहे. भरदिवसात वृद्ध महिलेची हत्या करण्यात आल्याने परिसरात भीतीचे वातावरण (Police) निर्माण झाले आहे. तर या महिलेचे मारेकरीला शोधण्याचा मोठा आव्हान नाशिक पोलिसांच्या समोर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Kumar : टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा अक्षय कुमारने घेतला धसका? घराबाहेर वाढवली सुरक्षा

Birthday Gift Ideas: लहान मुलांच्या वाढदिवसाला देता येतील असे 5 रिटर्न गिफ्ट्स

Maharashtra News Live Update: ४०० कोटींची जमीन ५६ कोटींना देण्याचा घाट, वरळीतील भूखंडाच्या भाडेपट्ट्यावरून वाद

Aadhaar Card Update: आधार कार्ड अपडेट करायचेय? नाव, पत्ता, जन्मतारीख बदलण्यासाठी लागतील ही कागदपत्रे

District Bank Elections: सुप्रीम कोर्टाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का, २० दिग्गज नेत्यांवर अपात्रतेची टांगती तलवार? यादीत कुणाची नावं?

SCROLL FOR NEXT