Nashik Ambad Crime News Saam TV
महाराष्ट्र

Nashik Crime : दरोडेखोरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू; ६ लाखांची रोकडही लुटली, थरकाप उडवणारी घटना

नाशिकच्या अंबड परिसरात दरोडेखोरांनी शेतातील एका घरावर दरोडा टाकत वृद्ध व्यक्तीवर हल्ला चढवला.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख, साम टीव्ही

Nashik Crime News : नाशिकच्या अंबड परिसरात दरोडेखोरांनी शेतातील एका घरावर दरोडा टाकत वृद्ध व्यक्तीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जगन्नाथ सदाशिव कर्डिले (वय ६८ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

अंबड परिसरात एक्सलो पॉईंट (Nashik) येथे कर्डिले यांचे शेतात घर आहे. घरातील सर्व कुटुंब नातेवाईकांच्या लग्नाकरीता बाहेर गेले होते. जगन्नाथ कर्डिले यांना बरे वाटत नसल्याने ते घरी थांबले होते. हीच संधी साधून दरोडेखोरांनी (Crime News) रात्री ८ वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला. चोरी करत असताना कर्डिले यांनी दरोडेखोरांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात कर्डिले यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर दरोडेखोरांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करत कपाटात असलेली सुमारे ६ लाखांची रोकड लुटून नेली. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी घरावर पाळत ठेवली होती.

सायंकाळी ७. ३० वाजता दोन ते तीन संशयितांनी घराची रेकी केली. यानंतर पाच ते सहा दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत वृद्धाला ठार करत रोकड लुटून नेली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात दरोडेखोरांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाच्याचा संसार मोडल्याचा प्रचंड राग! जंगलात नेऊन सासऱ्याच्या डोक्यात घातला दगड; पुण्यात हत्येने खळबळ

Mumbai Fire : मुंबईत अग्नितांडव! हायप्रोफाईल सोसायटीचा ११ वा मजला जळून खाक, २ जणांचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra News Live Update : रील्स बनवण्याच्या नादात १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

मुंबई हादरली! मध्यरात्री ३ ते ४ घरांवर दरड कोसळली; २ जणांचा दुर्दैवी मृत्यू, ८जण ढिगाऱ्याखाली

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

SCROLL FOR NEXT