Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक हादरले; आधी दारू पिऊन धिंगाणा, टोळक्याचा वाद अन् नंतर घडलं भयंकर

Nashik News : ठिकठिकाणी नाकेबंदी करत पोलीस गस्तीवर होते. याच दरम्यान नाशिक शहरात खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत लक्ष्मण पोपट घारे असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे

Rajesh Sonwane

तबरेज शेख 
नाशिक
: नवीन वर्षाच्या प्रारंभी शहरामध्ये सराईत गुन्हेगाराची हत्या झाल्याची घटना घडली आहे. यात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हल्ला करत डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार नाशिकच्या क्रांतीनगर सार्वजनिक बांधकाम भवन या परिसरात घडला आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक ठिकाणी पार्टी करण्यात आल्या. या पार्टीमध्ये मद्य प्राशन करून काहीजण गोंधळ घालत असतात. तर मद्य प्राशन करून वाहन चालवत असतात. अशाना चाप बसण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट होते. या अनुषंगाने ठिकठिकाणी नाकेबंदी करत पोलीस गस्तीवर होते. याच दरम्यान नाशिक शहरात खून झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत लक्ष्मण पोपट घारे (वय २८) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

जुन्या वादातून मारहाण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरात सर्वत्र नाके बंदीची कारवाई सुरू असताना क्रांती नगर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शेजारी मोकळ्या जागेत चार ते पाच संशयित मद्य पिऊन धिंगाणा घालत होते. याचा परिसरातील राहणारा लक्ष्मण घारे या सराईत सोबत या टोळक्यातील दोघा- तिघा संशयित सोबत पूर्वीचे वाद होते. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर टोळक्यातील काही जणांनी लक्ष्मणच्या डोक्यात दगडाने घालून हत्या करण्यात आली. 

चौघेजण ताब्यात 

नवीन वर्षाच्या प्रारंभी शहरात खुनाची घटना घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. टोळक्याकडून हत्या झाल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. दरम्यान या घटने बाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्या करणाऱ्या टोळक्यातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT