Nashik News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: फुकट दारू न दिल्यामुळे मद्यपी संतापला, थेट दुकानच पेटवलं; नाशिकमधील खळबळजनक घटना

Man Burnt Liquor Shop After Not Serving Free Liquor In Sinnar Phata: नाशिकमध्ये मोफत दारू न दिल्यामुळे एक धक्कादायक प्रकार घडलाय. ग्राहकाने थेट दारूचं दुकानंच जाळल्याचं समोर आलंय.

Rohini Gudaghe

अभिजित सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये दारूवरून एक धक्कादायक घटना घडली आहे. सिन्नर फाटा परिसरामध्ये ग्राहकाला मोफत दारू दिली नाही, म्हणून संतापलेल्या ग्राहकाने दारूचं दुकानंच पेटवून दिलंय. सिन्नर फाटा परिसरामध्ये ही धक्कादायक घटना काल १४ जूलै रोजी संध्याकाळी घडलीय. दारूचं दुकानंच पेटवून दिल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दुकानाला लागलेली आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

नक्की काय घडलं?

नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात सोनू भगत नावाचा एक व्यक्ती दारूच्या दुकानात गेला होता. सोनू भगतची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. सोनुने पैसे न देता मद्य मागितले. यासाठी त्याने दुकानदाराला देखील मोठ्या प्रमाणावर दमदाटी केली. परंतु दुकानदाराने त्यास मोफत दारू देण्यास नकार (Burnt Liquor Shop) दिला.

रागाच्या भरात दुकानालाच आग लावली

दुकानदाराने सोनुला दारू देण्यास नकार दिल्यानंतर तो (Nashik News) संतापला. रागाच्या भरात त्याने दुकानदाराला दमदाटी केली अन् त्यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची देखील झाली. परंतु राग अनावर झालेल्या सोनुने थेट दारूचं दुकानच पेटवून दिलंय. या घटनेत दुकानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. सोनू भगत याला नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहे.

नाशिकरोड पोलिसांची कारवाई

आतापर्यंत आपण दारूवरून भांडण झाल्याच्या अनेक घटना ऐकल्या (crime news) आहेत. बऱ्याच वेळा दारूवरून किंवा दारूच्या नशेत अपघात आणि खून झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. परंतु नाशिकमध्ये आता दारू (Liquor) दिली नाही म्हणून थेट दुकानच पेटवल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीने रागाच्या भरात दुकानालाच आग लावल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात प्रायव्हेट पार्ट्समध्ये फंगल इन्फेक्शन का होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Suryakumar Yadav : माझ्या नावानं खोटं..., व्हायरल पोस्टवर सूर्यकुमार यादवची सणसणीत चपराक, सूर्यवंशीसाठी खास मेसेज

French President Macron: मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष असलेल्या हॉटेलजवळ स्फोट; जगभरात खळबळ

Maharashtra News Live Update: आमदारांच्या बंद पडलेल्या कुक्कुटपालन केंद्रात आदिवासी विद्यार्थ्यांचे वस्तीगृह

Monsoon Foot Care: पावसाळ्यात चप्पल लागून पायावर फोड येतात? हे ७ सोपे उपाय करतील इन्फेक्शन आणि दुर्गंधी दूर

SCROLL FOR NEXT