Nashik Crime News Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime News: सोशल मीडियावरवर लाईव्ह येत शिवीगाळ; वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचाच खून

सोशल मीडियावरवर लाईव्ह येत शिवीगाळ; वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मित्राचाच खून

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक : इंस्टाग्राम फेसबुकवर लाइव करुन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मित्रांचे झालेले भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा खून झाल्याची घटना (Nashik) नाशिकमध्ये समोर आली आहे. पोलीस तपासात हे कारण पुढे आले आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्‍ही (CCTV) कॅमेरात कैद झाली आहे. (Maharashtra News)

नाशिकमध्‍ये झालेल्‍या घटनेचा पोलिसांनी सीसीटीव्‍हीच्‍या आधारे तपासाला सुरवात करून ९ जण ताब्यात घेतले आहेत. यात ६ जण हे अल्पवयीन आहेत. सिड़को परिसरातील सावतानगर येथे ही घटना घडली आहे. परशुराम बाळासाहेब नजान हा तरुण सावतानगर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आला होता. त्याच्यासोबत असलेल्या मित्राचे आणि संशयीत यांच्यात फेसबुकवर लाईव्ह येऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद (Crime News) झाला. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले.

वाद सोडवायला गेला अन्‌

मित्राचे हे भांडण सोडवण्यासाठी परशुरामने मध्‍यस्‍थी केली. त्यामुळे मारहाण करणाऱ्या संशयीतांपैकी काहींनी रस्त्यात पडलेला पेवरब्लॉक परशुरामच्या डोक्यात माराला. या मारहाणीत परशुराम याला गंभीर मार लागल्याने अतिरक्तस्राव झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान परशुरामचा मृत्यू झाला आहे. याबाबत नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अंबड पोलीस अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकाचवेळी खात्यात येणार ₹4,000? जाणून घ्या सत्य

Pitod Recipe : भाजी संपलीय? मग झटपट बनवा खमंग 'पितोड', चवीला लागेल भन्नाट

Political News: मोठी बातमी! 'त्या' २० बंडखोर खासदारांना झटका, सुप्रीम कोर्टाने बजवली नोटीस

SCROLL FOR NEXT