Nashik Crime Saam tv
महाराष्ट्र

Nashik Crime : फर्निचर मॉलवर धाडसी दरोडा; सुरक्षारक्षकाला डांबून ठेवत तांब्या पितळाच्या भांड्यांसह लाखोंचा ऐवज लांबविला

Nashik News : मॉलच्या रखवालीसाठी असलेले बशीर पठाण व काशिनाथ निकम यां सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी डांबून ठेवले.

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अंदरसुल येथील जीवन फर्निचर मॉलवर रात्रीच्या वेळी धाडसी दरोडा टाकण्यात आला आहे. मॉलमधील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून हा दरोडा टाकण्यात आला आहे. यात दरोडेखोरांनी तांबे- पितळेच्या भांड्यांसह इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून लाखोंचा ऐवज चोरी केला. 

नाशिकच्या (Nashik) येवला तालुक्यातील अंदरसुल येथील नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या जीवन फर्निचर या नावाने गृहीउपयोगी वस्तूंचा मॉल आहे. या मॉलवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच जणांच्या टोळक्याने धाडसी दरोडा टाकला आहे. मॉलच्या रखवालीसाठी असलेले बशीर पठाण व काशिनाथ निकम यां सुरक्षारक्षकांना चाकूचा धाक दाखवत चोरट्यांनी डांबून ठेवले. यानंतर मॉलच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकवून आत प्रवेश केला. 

दरोडेखोरांनी मॉलमधून साधारण १०० किलो तांब्याची भांडी, २० किलो पितळची भांडी, १२ टीव्ही संच, कुलर, सिलिंग, फॅन मिक्सर, इंडक्शन सेट यासह सिक्युरिटी कॅमेऱ्याचा डीव्हीआर सेट देखील चोरी करण्यात आली आहे. या (Crime News) दरोड्यात चोरीचे साहित्य नेण्यासाठी चोरट्यांनी छोटा हत्ती पिकअप वाहनाचा देखील वापर केला असल्याची माहिती मॉल संचालक सुधीर सुराडे यांनी दिली आहे. घटनेबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. घटनेचा पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Serial : ४ वर्षांचा प्रवास अखेर संपणार; लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, चाहते नाराज

Maharashtra News Live Update: पुणे सत्र न्यायालयाने नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल २९ जूनला देणार

Lohgad Case: ‘केतन जिवंत आहे’ ऐकताच सियाचा थरकाप उडाला थरकाप; लोहगड तरूणाच्या हत्येप्रकरणी मोठा गौप्यस्फोट समोर

Qutb Minar : जगातील सर्वात उंच विटांची मिनार! कुतुब मिनारला 'कुतुब' नाव कसे मिळाले? वाचा खास कनेक्शन

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

SCROLL FOR NEXT