Nashik News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik CCTV Footage: टोळक्याचा सोसायटीमध्ये घुसून तरुणावर जीवघेणा हल्ला, थरारक घटनेचा VIDEO आला समोर

Nashik CCTV Footage:शिबन शेख याच्यावर इतके वार झाले की त्याला उठता सुद्धा येत नव्हते.

साम टिव्ही ब्युरो

Nashik News : नाशिक रोड परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यांना तरुणावर हत्यारांसह हल्ला केला. या घटनेत तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु केला आहे.  (Latest Marathi News)

नाशिक रोड परिसरातील देवळाली गाव भागात म्हसोबा मंदिरामागे असलेल्या हरी श्रद्धा अपार्टमेंट मध्ये रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शिबान शेख या २७ वर्षीय युवकावर ४ ते ५ जणांनी जीवघेणा हल्ला करून जखमी केले. संपूर्ण घटना सोसायटीत लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

हरी श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणारा शीबान हा आपल्या घरी जात असताना हल्लेखोरांनी हातात तलवारी, कोयते आदी तीक्ष्ण हत्यारांनी त्याच्यावर जबर वार केले. शिबन शेख याच्यावर इतके वार झाले की त्याला उठता सुद्धा येत नव्हते. स्थानिकांच्या मदतीने त्याला त्वरित नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या हल्ल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिक शहरात जीवघेणे हल्ले, खून, दरोडे, तसेच चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT