Nashik crime News Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : नाशिक हादरलं! बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने बुटाच्या लेसने गळा आवळला

Nashik Crime News : नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने मद्यधुंद अवस्थेत लेसच्या सहाय्याने पत्नीची हत्या केली. आरोपी फरार असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

  • आरोपी पती हत्या केल्यानंतर फरार

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू

नाशिक मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका महिलेची तिच्या पटीने हत्या केली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नवऱ्याने लेसच्या सहाय्याने बायकोचा गळा आवळला असल्याचे उघडं झाले आहे. या झटापटीत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल घडली असून आरोपी फरार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव शीतल भामरे ( Shital Bhamre) असून तिच्या पतीचे नाव नितीन भामरे (Nitin Bhamre) आहे. ढिकले वाचनालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर भामरे दाम्पत्य हे कुटुंबासोबत राहतं आहेत. गुरुवारी दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचं भांडण झालं. नितीन हा शीतलवर गेले काही दिवस सतत संशय घेत होता. या कडाक्याच्या भांडणातून मद्यपी नितीनने लेसच्या साहाय्याने त्याची बायको शीतल भामरे हिचा गळा आवळून ठार मारले. हत्या केल्यानंतर त्याने दरवाजाला कुलूप लावून घेत घरातून पलायन केले.

यानंतर सासू, सासरे व नणंद दुपारी घरी आल्या असता त्यांना घराच्या दरवाजाला कुलूप लावलेले दिसले. गोदाकाठी कामाच्या ठिकाणी चौकशी केली असता तेथेही शीतल न आढळल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली. पुन्हा मोबाइलवर फोन केला असता रिंगटोनचा आवाज घरातून येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला असता शीतल पलंगावर मृतावस्थेत पडलेली दिसली.

यादरम्यान भामरे कुटुंबीयांनी याची तक्रार पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तपासाचा धागा शीतलच्या नवऱ्याभोवती फिरत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी नितीनवर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय त्याचा तपास देखील पोलिसांनी सुरु केला असून शीतल हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या हत्येनंतर नाशिकमध्ये (Nashik News) खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT