तबरेज शेख
नाशिक : नाशिकच्या शिवाजीनगर येथील कुबेर भंडारे महादेव मंदिराच्या दानपेटीवर चोरट्याने डल्ला मारला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सकाळी भाविक पूजेसाठी मंदिरात आल्यानंतर हा प्रकार समोर आला. मंदिरातील हजार रुपयांचे दान या चोरट्याने लंपास केले.
घरात दरोडा टाकण्यासोबत आता चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीवर देखील नजर ठेवण्यास सुरवात केली आहे. मंदिरात प्रवेश करून तेथील (Crime News) दानपेटी फोडण्याचे काम हे चोरटे करत आहेत. अशाच प्रकारे नाशिक शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेल्या कुबेर भंडारे महादेव मंदिरातील दानपेटी पहाटेच्या सुमारास फोडण्यात आली आहे. चोरट्याने मंदिरात प्रवेश करून ठेवलेली दानपेटी फोडली. यात असलेली सर्व रक्कम घेऊन तो पसार झाला.
नाशिक (Nashik) शहरात अनेक मंदिरात अशाच पद्धतीच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. या आधी देखील सातपूर परिसरामध्ये एका मंदिरात चोरट्याने दानपेटीवर डल्ला मारला होता. दरम्यान कुबेर भंडारे महादेव मंदिरात चोरीची घटना घडली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चोट्यांवर लवकरात लवकर आळा घालावा आणि यांना पोलिसांनी लवकर पकडावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.