Nashik Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Crime News : डॉक्टर महिलेला पती-सासऱ्याने दगडाने ठेचून संपवलं; हत्येचं कारण ऐकून सर्वांना धक्काच बसला

Nashik News : नाशिकच्या नांदगाव येथील डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा आधी समोर आलं होतं.

प्रविण वाकचौरे

अजय सोनावणे

Nashik News :

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आहे. डॉक्टर महिलेची पती आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हत्या करुन अपघात असल्याचा बनाव बाप-लेकाने रचला होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकच्या नांदगाव येथील डॉ. भाग्यश्री किशोर शेवाळे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा आधी समोर आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू अपघाती नसून पतीसह सासऱ्यानेच दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्याची फिर्याद नांदगाव पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

याप्रकरणी पोलिसांनी भाग्यश्री यांचा पती डॉ. किशोर नंदू शेवाळे व त्याचे वडील नंदू राघो शेवाळे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे अपघाताचा बनाव उघडकीस आला असून, तब्बल १५ दिवसांनी खुनास वाचा फुटली आहे. (Crime News)

पत्नीचा अपघात झाल्याची माहिती

डॉ. भाग्यश्री यांचा २७ सप्टेंबरला मन्याड फाटा या ठिकाणी दुचाकीचा अपघात झाला असून त्या अपघातात त्या मृत्युमुखी पडल्याची माहिती पती डॉ. किशोर शेवाळे याने चाळीसगाव पोलिसांना दिली होती. त्यानुसार चाळीसगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत हा गुन्हा नांदगाव पोलिसांकडे वर्ग केला होता.

पती किशोर शेवाळे याला दवाखाना बांधायचा होता. त्यासाठी डॉ.भाग्यश्रीने माहेराहून २५ लाख रुपये आणावे, असा तगादा पतीने लावला होता. मात्र भाग्यश्री यांनी ही मागणी पूर्ण केली नाही म्हणून बाप-लेकाने संगनमताने त्यांची हत्या केली, असा आरोप डॉ. भाग्यश्री यांच्या भावाने केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ५ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार? जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्ताबाबत मोठी अपडेट

Maharashtra Live News Update: मातंग समाज पुन्हा आक्रमक,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उमटणार पडसाद

Ajit Pawar Death : राजीव गांधींची हत्या झाली तशीच अजित पवारांची झाली का? राष्ट्रवादीच्या आमदाराचे ८ सवाल

Success Story: आधी CA, मग IPS, नंतर IAS अधिकारी; माधव अग्रवाल यांचा प्रेरणादायी प्रवास

Misal Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी झणझणीत मिसळ कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT