Lasalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Lasalgaon Crime : तीन तोळ्याची सोन्याची पोत चोरण्याचा प्रयत्न; ग्राहकांच्या सतर्कतेने चोरटा अडकला 

Nashik News : नाशिकच्या लासलगाव शहरातील मेनरोडवरील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एका नामांकित सोनाराच्या दुकानात २७ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न लासलगाव येथे घडला. मात्र दुकानात (Nashik) आलेल्या ग्राहकांच्या सतर्कतेमुळे चोरट्याने केलेला चोरीचा हा प्रयत्न फसला आहे. (Crime News) हा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Latest Marathi News)

नाशिकच्या लासलगाव शहरातील मेनरोडवरील रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एका नामांकित सोनाराच्या दुकानात २७ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. सोने खरेदीसाठी दुकानात आलेल्या ग्राहकाला दुकानदार (Gold) सोन्या- चांदीची दागिने दाखवत होता. याच वेळी तोंड बांधलेला एक चोरटा दुकानात शिरला आणि दुकानदार आणि ग्राहकाची नजर चुकवून तीन तोळ्याची अंदाजे २ लाख रुपये किंमतीची पोत उचलून पोबारा करण्याच्या प्रयत्नात होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुकानातील ग्राहकाने पकडले 

याच वेळी दुकानात असलेल्या ग्राहकाने सतर्कता दाखवत पकडल्याने चोरट्याचा चोरीचा प्रयत्न फसला. हा चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानात असलेल्या (CCTV) सीसीटिव्ही कॉमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र सोन्याची पोत चोरी करणारा हा चोरटा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT