Nashik News Today
Nashik News Today Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: एकतर्फी प्रेमातून तरुणीचं अपहरण; तणावातून रेल्वेखाली उडी घेत आई-वडिलांनी संपवलं जीवन

Shivani Tichkule

नवनीत तापडिया

Nashik Breaking News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.

त्यातच आता राज्यातील नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय तरुणीचं अपहरण केल्याची घटना घडली आहे. मुलीचं अपहरण झाल्याच्या तासाभरातच आई-वडिलांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

नेमकं प्रकरण काय?

एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीकडे लग्नासाठी तगादा लावत अपहरण करण्यात आलं. मुलीचं अपहरण झाल्याने तणावाखाली येऊन मुलीच्या आईवडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या (Nashik) देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

रविवारी दुपारी एकच्या सुमारास तरुणी ही आपल्या आई वडिलांसोबत दुचाकीवरुन प्रवास करत असताना, चारचाकीतून आलेल्या तरुणाने आपल्या साथीदारांसह तरुणीचं अपहरण केलं. तसंच आई-वडिलांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. मुलीचं अपहण आणि तरुणाचा लग्नासाठी तगादा, या सततच्या त्रासाला कंटाळून आई- वडिलांनी भगूर नानेगाव रेल्वे ट्रॅकवर गोदान एक्स्प्रेसखाली उडी घेत आत्महत्या केली.  (Breaking Marathi News)

दरम्यान, सिन्नर पोलीस (Police) ठाण्यात मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनूसार अपहरण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी समाधान जनकर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू आहे.हे प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे. (Nashik Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

SCROLL FOR NEXT