Nashik crime news  saam tv
महाराष्ट्र

नाशिक हादरलं! अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

अंबड पोलिसांत गुन्हा दाखल, संशयिताला १४ दिवसांची पोलीस कोठडी.

साम टिव्ही ब्युरो

नाशिक: भंडारा जिल्ह्यातील महिलेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक (Nashik) अत्याचाराच्या घटनेने हादरलं आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक शहरातील सिडको परिसरात अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर ५६ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधी पोस्को अन्वये बलात्कार, व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यन्वये (ॲट्रोसिटी) अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने संशयिताला १४ दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे.

पुण्यातही ७ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण

काल पुणे (Pune) शहरातून धक्कादायक वृत्त समोर आले होते. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात ७ वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक घटना समोर आला होता. सदर घटना सोमवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात पोस्को आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ वर्षीय चिमुरडीच्या वडिलांचा स्टेशन परिसरात चहाचा स्टॉल आहे. दुपारी ही मुलगी वडिलांना जेवणाचा डबा देण्यासाठी गेली. डबा देऊन परत येत असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले. त्यानंतर फलाट क्रमांक सहाच्या भिंतीजवळ असणाऱ्या कन्स्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील बंद असणाऱ्या खोलीत नेऊन तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या अज्ञात आरोपीने चिमुरडीला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, लघुशंकेच्या बहाण्याने ही मुलगी बाहेर गेली आणि त्याच्या तावडीतून सुटली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: बच्चू कडूंचं ईव्हीएम विरोधातील तूर्तास आंदोलन मागे

Sweet Potato: रताळ्यापासून बनवा असे स्वादिष्ट पदार्थ

Maharashtra CM : महायुतीचं संभाव्य मंत्रिमंडळ, कुणाला मिळणार संधी, कोण स्पर्धेत?

Yoga Tips: गृहिणीसाठी फिटनेस उपयुक्त योगा टिप्स

Nana Patole: काँग्रेसच्या पराभवानंतर नाना पटोलेंची दिल्लीवारी, हायकमांडची घेणार भेट

SCROLL FOR NEXT