सिन्नर शहरात कॉफी शॉपच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. तरुण-तरुणींना प्रायव्हसी उपलब्ध करून देणारे अड्डे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहेत. (Crime News)
सिन्नर बस स्थानक परिसरात तसेच शहरातील गजबजलेल्या भागांमध्ये असलेल्या या कॉफी शॉपमध्ये प्रेमी युगुल, महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आणि अल्पवयीन शाळकरी मुला-मुलींना प्रायव्हसी उपलब्ध करून दिली जायची. कॉफी विक्री अथवा कॉफी बनवण्याचे कोणतेही साहित्य या ठिकाणी आढळून न आल्याने पोलीस पथकाने प्रेमी युगुलांचे हे अड्डे अक्षरशः तोडफोड करून उद्ध्वस्त केले. (Latest Marathi News)
सिन्नर शहरातील आठवण कॅफे, व्हॉट्सअप कॅफे, रिलॅक्स कॅफे, हर्टबिट कॅफे या नावाने सुरू असलेल्या कॉफी शॉपमध्ये मुला-मुलींना प्रायव्हसी उपलब्ध करून देण्यात येत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या होत्या. पोलिसांच्या पथकाने या कॉफी शॉपची तपासणी केली असता त्या ठिकाणी सुरू असलेला अश्लील चाळ्यांचा उद्योग उघडकीस आला. (साम टीव्हीचं व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करा)
या कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवण्याचे कुठलेही साहित्य आढळून आले नाही अथवा कॉफी विक्री केली जात असल्याचही निष्पन्न झाल नाही. महाविद्यालयीन आणि अल्पवयीन मुला-मुलींना तासाभरासाठी ठराविक रक्कम आकारून या ठिकाणी एकांत उपलब्ध करून दिला जायचा. त्यानंतर पोलिसांनी हे कॉफी शॉपचे अड्डे उद्ध्वस्त केले असून सिन्नर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.